अब अनिल परब का नंबर भी आयेगा; सोमय्या यांचा दावा

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना ८ मार्च रोजी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकत खळबळ उडवून दिली. त्यानंतर आता भाजपचे नेते किरीट सोमय्या हे पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झाल्याचे बघायला मिळत असून यंदा त्यांनी परिहवन मंत्री अनिल परब  यांच्यावर निशाणा साधला आहे.

किरीट सोमय्या यांनी ट्विट करत हा दावा केला आहे. ते म्हणतात की, आत्ता अनिल परब चा ही नंबर लागणार.अनधिकृत, बेनामी रिसॉर्ट आणि रिसॉर्ट बांधकामासाठी आलेला पैसा… चौकशी होणार. भारत सरकारनं दापोली कोर्टात तक्रार दाखल केली आहे. ३० मार्च रोजी सुनावणी होणार” या आशयासह सोमय्यांनी रिसॉर्टचे दोन फोटोही शेअर केले आहेत.

 

दरम्यान काही दिवसांपूर्वीच किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांचं रिसॉर्ट आणि बंगला बेकायदेशीर असल्याचा दावा केला होता. त्यावेळी सोमय्या म्हणाले होते की, “मुरुड गावात उद्धव ठाकरे यांचा उजवा हात अनिल परब यांनी बेकायदेशीररित्या रिसॉर्ट आणि बंगला बांधला आहे. ज्याची चौकशी सुरु आहे. अनिल परब यांचा बेकायदेशीर रिसॉर्ट आणि त्याचा जवळील भव्य बंगल्यावर कारवाई येत्या काही दिवसांत होणार आहे.

Share