मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; आमदार संग्राम जगताप थोडक्यात बचावले

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर रसायनीजवळ एसटी बस आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात अहमदनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप थोडक्यात बचावले आहेत. या अपघातात आ. संग्राम जगताप यांच्या कारचा चक्काचूर झाला आहे. आज पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

आमदार संग्राम जगताप हे आपल्या मर्सिडिज कारमधून मुंबईच्या दिशेने येत होते. त्यावेळी रसायनी पोलिस स्टेशनच्या हद्दीत हा अपघात झाला. आमदार जगताप यांच्या कारची एसटी बससोबत जोरदार धडक झाली. यामध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या आलिशान कारचा चक्काचूर झाला. अपघातानंतर कारमधील एअरबॅगही उघडल्या. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

या अपघातानंतर मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Share