नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा प्रधानमंत्री बनवायचं आहे; मुरलीधर मोहोळ

पुणे लोकसभा मतदार संघातून भाजपने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली. त्यानंतर त्यांनी निवडणूक प्रचारास सुरुवात केली. ग्रामदेवतांच्या दर्शनाने करत त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला. मुरलीधर मोहोळ म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे शहराचा विकासाकडे चांगले लक्ष दिले आहे. अनेक प्रकल्प आणि योजना पुणे शहरात सुरु केल्या आहेत. आता पुणेकर सुद्य आहेत ते विकासाला प्राधान्य देतील. सगळे पुणेकर आमच्या सोबत आहे. 100 टक्के आमची एकी शेवटपर्यंत राहणार आहे. दरम्यान, पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट घेतली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे पुण्यातील पदाधिकाऱ्यांना आदेश दिले. मुरलीधर मोहोळ यांना निवडून आणण्यासाठी जनतेपर्यंत जाण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

मुरलीधर मोहोळ यांचा राजकीय प्रवास पुणे मनपातून सुरु झाला. ते नगरसेवक झाले. मनपाच्या शिक्षण मंडळाचे ते सदस्य होते. २००९ मध्ये खडकवासला विधानसभा मतदार संघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. २०१७-१८ मध्ये पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष होते. तसेच २०१७-१८ मध्ये स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे संचालक, पीएमपीचे संचालक, पीएमआरडीएचे सभासद ते होते. पुणे शहराचे महापौर म्हणून त्यांनी २०१९ ते २०२२ दरम्यान जबाबदारी सांभाळली आहे. तसेच २०२३ मध्ये भाजपचे प्रदेश सरचिटणीसपदावर ते होते.

आता पुण्यात मुरलीधर मोहोळ यांचा समाना कोण करणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पुण्यात काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी, रविंद्र धंगेकर, आबा बागुल तर आता नुकताच मनसेला राम राम ठोकलेले वसंत मोरे, प्रविण गायकवाड, या नावांची चर्चा आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आता कुणाला तिकीट देणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.

जगदीश मुळीक हेही लोकसभेच्या स्पर्धेत होते. भाजपचे विद्यमान आमदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर त्यांनी ही जागा लढवण्याची इच्छा जाहीरपणे व्यक्त केली होती. त्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मात्र त्यांनी फेसबूक पोस्ट करत आपले म्हणणे मांडले आहे. जनतेच्या सेवेत कायमच असेन.कोणतेही पद नसतानाही माझ्या साठी जनतेने कार्यकर्त्यांने दाखवलेले प्रेम पाहून मी कायमच कृतज्ञ आहे. जनतेचे प्रेम आणि विश्वास पारदर्शक, स्वच्छ काम असेच कायम ठेवणे ही माझी जबाबदारी  आहे  जी मी पूर्ण निष्ठेने पार पाडणार आहे. पुन्हा एकदा तमाम जनता आणि कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद, अशी पोस्ट जगदीश मुळीक यांनी यांनी केली आहे.

Share