धवल कुलकर्णी याची प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती; रणजी क्रिकेट

रणजी ट्रॉफीच्या फायनल सामन्यात मुंबई टीमने विजय मिळवला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर अंतिम सामना पार पडला असून मुंबईनं ऐतिहासिक विजय मिळवत रणजी ट्रॉफीवर 42 व्यांदा आपलं नाव कोरलं आहे. या सामन्यानंतर भारताचा माजी क्रिकेटर आणि मुंबई टीमकडून रणजी क्रिकेट खेळणारा धवल कुलकर्णी याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. रणजी ट्रॉफीच्या फायनल सामन्यात मुंबई टीमने विदर्भच्या टीमला धूळ चारुन दणदणीत विजय मिळवला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर अंतिम सामना पार पडला असून मुंबईनं ऐतिहासिक विजय मिळवत रणजी ट्रॉफीवर 42 व्यांदा आपलं नाव कोरलं आहे. या सामन्यानंतर भारताचा माजी क्रिकेटर आणि मुंबई टीमकडून रणजी क्रिकेट खेळणारा धवल कुलकर्णी याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

धवल कुलकर्णीच्या निवृत्तीनंतर त्याचा खास मित्र आणि टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. “मुंबई चा योद्धा” अशी त्यानी पोस्ट शेअर केली आहे. त्या सोबतच  मुंबई संघातील खेळाडूंनी त्याला मराठीतून शुभेच्छा दिल्या आहेत. याचा व्हिडिओही बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, शार्दुल ठाकूर आणि शम्स मुलानी धवलला शुभेच्छा देताना दिसत आहेत

Share