‘काही लोकांकडून माझ्या जिवाला धोका…’,वैशाली भैसले

मुंबईः  राष्ट्रवादीचे नेत्या आणि गायिका वैशाली भैसले – माडे ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहते. वैशालीने नुकतीच फेसबुकवर एक पोस्ट करत तिच्या जिवाला धोका असल्याचे सांगितले आहे. ही पोस्ट पाहून तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. त्याबाबद स्वतः वैशालीने दोन दिवसांनंतर पत्रकार परिषद घेऊन या गोष्टी सांगणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

फेसबुकवर पोस्टवर वैशालीने लिहिले की, ‘काही लोकांकडून माझ्या जिवाला धोका आहे. माझ्या हत्येचा कट रचला जात आहे. दोन दिवसानंतर पत्रकार परिषद घेऊन मी याचा गौप्यस्फोट करणार आहे.आज मला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे.’

वैशालीची पोस्ट पाहून चाहत्यांना धक्काच बसला आहे. आता सगळ्यांसमोर प्रश्न आहे की अचानक असे काय झाले की वैशालीच्या हत्येचा कट रचला जात आहे हा प्रश्न अनेकांना पडला आहे. स्वतः वैशालीने दोन दिवसांनंतर पत्रकार परिषद घेऊन या गोष्टी सांगणार असल्याचे स्पष्ट केले.

कोण आहेत वैशाली भैसले – माडे ?

वैशाली माडे यांचा एका सुप्रसिद्ध गायिकेपर्यंतचा प्रवास मोठ्या संघर्षासह अनेक चढ-उतारांचा राहिला आहे. त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील खार तळेगाव येथे झाला आहे. त्यांचं माहेरचं नाव वैशाली भैसने. बालपणी गरिबीमुळे त्यांना अनेक हाल-अपेष्टा सहन कराव्या लागल्यात. मात्र, याही परिस्थितीत त्यांनी त्यांच्यातील गायिका जिवंत ठेवली. पुढे त्यांचं लग्न वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटचे अनंत माडे यांच्याशी झालं. त्यांच्या या प्रवासात त्यांच्या पतीचाही मोठा वाटा आहे.

एका सर्वसामान्य घरातील मुलगी ते चित्रपट सृष्टीतील नामवंत गायिका हा वैशाली यांचा प्रवास अतिशय संघर्षाचा आहे. ‘झी’ वरील मराठी आणि हिंदी अशा दोन्ही स्पर्धांचं विजेतेपद पटकावल्यानं वैशाली यांचे महाराष्ट्रासह देशभरात चाहते आहेत. वैशाली माडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी देखील आहेत.

Share