किरीट सोमय्या वेडा माणूस- संजय राऊत

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यातील आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत.  भाजप नेते किरीट सोमय्या आज कोर्लई गावात जाणार आहेत. ठाकरे कुटुंबाच्या १९ बंगल्यांबाबात तक्रार करण्यासाठी किरीट सोमय्या कोर्लईत सोमय्या पोहोचल्याने संजय राऊत यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. कोण हा किरीट सोमय्या ? वेडा माणूस इकडे तिकडे फिरत आहेत. ते जेलमध्ये जाणार असून त्याचा रस्ता शोधत आहेत. ते इथे तिथे पळत आहेत. येथील जनता त्यांची धिंड काढतील. असे राऊत म्हणाले.

बंगले अदृश्य झालेत का? आम्हीही विचारतोय बंगले कुठे आहेत? सोमय्याच्या स्वप्नात बंगले येतात, वेडा झालाय तो. त्याला स्वत:चे बंगले स्वप्नात दिसत आहेत. त्याची बेनामी प्रॉपर्टी कुठे असेल तर ते त्याला दिसत आहे. कागदपत्रं सरपंचांनी दिले आहेत. त्या जमिनीवर एकही बंगला नाही. बांधकाम नाही. याला स्वप्नात बंगले दिसतात. हा काही तरी भुताटकीचा प्रकार आहे. भाजपच्या लोकांना भुताटकीनं झपाटलं आहे. त्यांच्या स्वत:च्या बेनामी प्रॉपर्टी स्वप्नात दिसतात आणि दुसऱ्यांच्या म्हणून बोंबलतात, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Share