राजकीय तमाशा नानाभाऊंनी बंद करावा – सुधीर मुनगंटीवार

चंद्रपुर : राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काॅग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यानंतर सारवासारव केली. त्यावरुन एक राजकीय तमाशा करत त्यांनी महाराष्ट्राचा पप्पू म्हणून जन्म घेतला आहे. अशी टिका मुनगंटीवार यांनी केली आहे.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, नाना पटोले यांना विसरण्याचा एक आजार जडलाय. त्यांची मागच्या १० वर्षातील काँग्रेसबाबतची भाषणे ऐकली तर ,ती ही एक हास्यजत्रा होईल. काँग्रेसबद्दल ते काय बोलायचे, काँग्रेसविषयी ते किती वाईट बोलायचे, सोनिया गांधींविषयी ते कसे बोलायचे याचे त्यांचे १० वर्षाचे रेकॉर्ड आहेत. ते विधानसभेत देखील काँग्रेसबद्दल अतिशय निम्न शब्दात बोलले होते. म्हणून ते काय बोलतात ही एक हास्यजत्रा आहे. म्हणूनच त्यांना आता महाराष्ट्राचे पप्पू म्हणून त्यांनी जन्म घेतलाय .

नाना पटोले यांच्या बुद्धीला गंज चढलाय. सत्तेच्या मोहात जेव्हा पक्ष वाढत नाही तेव्हा अशा पद्धतीचं भाष्य करणं, केंद्र सरकारबद्दल भाष्य केलं जातंय. आपल्या राज्यात आपल्यावर असलेली जबाबदारी विसरायची आणि येता-जाता प्रत्येक गोष्टीला केंद्र कसं जबाबदार आहे अशी बेजबाबदार विधानं करायची हा एक नवीन छंद आमच्या नाना भाऊंना जडला आहे.

नाना पटोले यांनी ज्या पद्धतीने मोदींबद्दल उद्गार काढले आणि नंतर जी सारवासारव केली हा एक राजकीय तमाशा आहे. यातून महाराष्ट्राच्या पप्पूने जन्म घेतलाय, असं वाटावं अशी त्यांची कृती आहे,” असंही मुनगंटीवार यांनी सांगितलं.अस मत सुधीर मुनगंटीवर यांनी व्यक्त केलं.

 

 

Share