तर आज शिवसेनेचा पंतप्रधान असता- खा. संजय राऊत

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त काल राज्यातील शिवसैनिकांशी पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी दूरदृष्यप्रणाली द्वारे संवाद साधला. यावेळी पक्षप्रमुख उद्वव ठाकरेंनी केलेल्या वक्तव्यांचं शिवसेना खा. संजय राऊत यांनी समर्थन केलं आहे.

शिवसेना खा. संजय राऊत माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, भाजपला आम्ही महाराष्ट्रामध्ये जमिनीवरुन आकाशापर्यत पोहचवले आहे. आम्ही युती धर्म कायम पाळला असून इतिहास याला साक्ष आहे. तसेच ही केवळ शिवसेनेची गोष्ट नसून जे चांगल्या हेतूने भाजपसोबत गेलेत त्या सर्व पक्षांचे हेच हाल झाले आहेत. अकाली दल असो, गोव्यात एमजीपी असो किंवा हरियाणा असो, चंद्रबाबू नायडू असो, जयललिता असो सर्वाना त्याची किंमत चुकवावी लागलीय, असेही खा. राऊत म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,बाबरीनंतर शिवसेनेची आणि बाळासाहेब ठाकरेंची उत्तर भारतामध्ये एक लाट होती. त्यावेळी आम्ही उत्तर प्रदेश, हरियाणा, बिहार, पंजाब अगदी जम्मू काश्मीरपर्यंत निवडणूक लढलो असतो तर काल जसं उद्धव ठाकरेंनी सांगितलं त्याप्रमाणे देशात आमचा पंतप्रधान असता. परंतु आम्ही हे सारं भाजपासाठी सोडलं असेही राऊत यावेळी म्हणाले.

Share