गांधीधाम-पुरी एक्सप्रेसच्या दोन डब्यांना शनिवारी सकाळी आग लागली. नंदुरबार रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर ही घटना घडली. आगीवर नियंत्रण मिळाले असून आग विझवण्यात आली आहे . ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
नंदुरबार रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर गाडी असताना एक्सप्रेसमधील पॅन्ट्रीच्या डब्यात आग लागली. आग लागल्याचे समजताच ट्रेन थांबवण्यात आली. त्यानंतर रेल्वेतील प्रवाशी गाडीतून बाहेर पडले. जीव वाचवण्यासाठी प्रवाशांची एक्सप्रेसमध्ये एकच धावपळ उडाली.
#UPDATE | Fire extinguised in the pantry car of 12993 Gandhidham-Puri Express at Nandurbar station in Maharashtra; coach detached: Western Railway pic.twitter.com/lFT5MZdqdn
— ANI (@ANI) January 29, 2022
भडकत जाणारी आग आणि त्यामुळे पसरलेल्या धुराच्या लोट पसरल्याने काही प्रवाशांना तर श्वास घेण्यासही त्रास झाला. स्टेशन जवळ आल्याने एक्सप्रेसचा स्पीड कमी होता. त्यामुळे मोटरमनने एक्सप्रेस थांबवली. अग्निशमन दलाच्या जवानांनीही घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यास त्यांना यश आले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या होत्या.