आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा; नितेश राणेंची मागाणी

नागपुर : शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीला ‘AU’ नावाने ४४ वेळा फोन आले. ‘एयू’चा अर्थ आदित्य उद्धव ठाकरे असा होतो, असा गौप्यस्फोट राहुल शेवाळे यांनी लोकसभेत केला आहे. शेवाळे यांच्या आरोपानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान, शेवाळेंच्या आरोपांनंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी केली आहे.

भाजप आमदार नितेश राणे म्हणाले की, सुशांत राजपूत मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांचे नाव का घेतलं जातं. फक्त त्यांचेच नाव का घेतलं जाते. एकेकाळी राहुल शेवाळे हे मातोश्रीचे लाडके होते. त्यांनीच हा विषय काढला आहे. शेळावे सांगतात की रिया चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरे यांचे ४२ कॉल झाले आहेत,या प्रकरणातील तपास अधिकारी का बदलला,असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.

तसेच, सुशांत राजपूत, दिशा सालियन मृत्यूची केस पुन्हा ओपन करा. दिशाचा पोस्टमोर्टम रिपोर्ट अद्यापही बाहेर आलेला नाही, त्यामुळे आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट केली तर सत्य समोर येईल. ज्याप्रमाणे श्रद्धा वालकर हिच्या खूनप्रकरणी आफताब पुनावाला याची नार्कोटेस्ट होते तशीच आदित्य ठाकरे यांची नार्कोटेस्ट करा, असे नितेश राणे म्हणाले.

Share