नेदरलँड्चा फलंदाज बेन कूपरची निवृत्तीची घोषणा !

आंतरराष्ट्रीय-  नेदरलँड संघाचा स्टार फलंदाज बेन कूपरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. वयाच्या २९व्या वर्षी कूपरने क्रिकेटला रामराम ठोकला आहे. २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या कूपरने नेदरलँड्कडून ७१ सामने खेळले आहेत. त्याने ट्वीट करून निवृत्तीची घोषणा केली आहे.

आज मी ,आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आहे. ८ वर्षे देशाचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. हा काळ विशेष क्षण, आश्चर्यकारक चढ-उतारांनी भरलेला आहे . नेदरलँड् क्रिकेटचे आभार मानत म्हटले आहे की, माझे बालपणीचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. मी माझ्या संघातील विद्यमान आणि माजी खेळाडू आणि प्रशिक्षकांचेही आभार मानतो. छान आठवणींसाठी तुम्हा सर्वांचे आभार मानत त्यांने निवृत्तीची घोषणा केली.

Share