राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ रुग्णालयात दाखल

मुंबई : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते  छगन भुजबळ यांना आज सकाळी बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. छगन भुजबळांना व्हायरल इन्फेक्शनमुळे रुग्णालयात दाखल झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. आज संध्याकाळीचं रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याचे माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल इंफेक्शन झाल्यानंतर भुजबळ यांनी घऱगुती उपचार केले होते. यानंतर त्यांनी पक्षाच्या शिर्डी येथील शिबीरालाही उपस्थिती लावली होती. मात्र सोमवारी सकाळी त्रास वाढल्याने ते बॉम्बे रुग्णालयात दाखल झाले आहेत. आज संध्याकाळीच त्यांना डिस्चार्ज दिला जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भुजबळ यांच्यावर डॉक्ट्रांकडून उपचार केले जात असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Share