शरद पवारांनी शिवसेना फोडली म्हणणाऱ्या बंडखोर नेत्यांना राष्ट्रवादीचं प्रत्युत्तर

मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांनी शिवसेना फोडली, मातोश्रीसोबत दगाफटका केला, ठाकरे यांचा विश्वासघात केला, आणि स्वतःची कृती योग्य आहे हे दाखवण्यासाठी त्याचे खापर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माथी मारण्याचा केविलवाणा प्रयत्न नेते करत असल्याचे जोरदार प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे दिले आहे.

शरद पवार यांनी राष्ट्रवादी-शिवसेना-कॉंग्रेस या तीन पक्षांची मोट बांधली आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून चांगला कारभार केल्यामुळेच देशाच्या पाच टॉप मुख्यमंत्र्यांच्या यादीत नाव आले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना सोडून जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे यांच्याच मागे खंबीरपणे उभी आहे असेही महेश तपासे यांनी सांगितले.

 

शिंदे गटाने शिवसेना फोडली याचे खरे सूत्रधार भाजप असून २०१९ मधील जो राग आहे त्यातून हे षडयंत्र सुरू आहे. पोलीस बळ आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर करत आमदार खासदार यांना भयभीत केले गेले आहे आणि यामध्ये उद्धव ठाकरे कसे चुकले हे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे मात्र राज्यातील जनता व शिवसैनिक ज्यांना निवडून दिले त्यांनी मातोश्रीबरोबर कशी गद्दारी केली हे पाहात आहे असेही महेश तपासे म्हणाले.

Share