शिंदे गटाकडून वरुण सरदेसाईंची युवासेना पदावरून हकालपट्टी

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पाठोपाठ आता युवा सेनेलाही सुरुंग लावायला सुरुवात केली आहे. युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांची आज युवासेना राज्य सचिव पदावरुन हकालपट्टी करत त्यांच्या जागी किरण साळी यांची नियुक्ती केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी चाळीस आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी करत शिवसेनेच्या सत्तेला सुरुंग लावला. त्यांच्या बंडानंतर अनेक लोकप्रतिनिधी शिंदे गटात सामील होत आहेत. ठाणे, नवी मुंबई, पालघर आदी भागातील पदाधिकारी शिंदे गटात सामील होत असल्याने शिंदे गटाकडून शिवसेनेवर दबाव टाकण्यात सुरुवात केली आहे.

कोण आहेत वरूण सरदेसाई?

वरुण देसाई हे युवासेना प्रमुख आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ आहेत. वरुण देसाई यांना पक्षाने युवासेनेच्या राज्य सचिवपदाची जबाबदारी सोपवली होती. वरुण देसाई यांनी अभियांत्रिकेचे शिक्षण घेतले आहे. ते अतिशय आक्रमक स्वभावाचे म्हणून ओळखले जातात. तसेच आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी जाहीर मागणी सर्वप्रथम वरुण यांनीच केली होती. लोकसभा निवडणुकीच्या वेळी वरुण सरदेसाई हे शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. आदित्य ठाकरेंच्या जन आशीर्वाद यात्रेच्या नियोजनात वरुण सरदेसाई यांचा मोठा सहभाग होता.

Share