मनपाच्या विशेष सभेत नगरसेवकाने सोडले सिगारेटचे झुरके !

नागपूर-  नागपूर महानगर पालिकेने बोलावलेल्या विशेष सभेत काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक सिगारेटचे झुरके  सोडताना दिसून आले आहे. रमेश पुणेकर असे काँग्रेस नगरसेवकाचे नाव आहे आहे. महानगरपालिकेच्या काल पार पडलेल्या ऑनलाइन विशेष सभेत ही घटना घडली आहे.

नागपूर शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न तसेच कचरा संकलन करणाऱ्या दोन खासगी कंपन्यांच्या कारभारा संदर्भात महापालिकेची विशेष ऑनलाइन सभा बोलविण्यात आली होती. या ऑनलाइन सभेत कचरा संकलन करणाऱ्या दोन्ही कंपन्यांच्या कारभारा संदर्भात चौकशी समितीचा अहवाल मांडण्यात आला. अहवालावर चर्चा सुरू असताना काँग्रेसचे नगरसेवक रमेश पुणेकर हे सिगारेटचे झुरके सोडताना दिसून आले. रमेश पुणेकर या सभेसाठी नाईक तलाव परिसरातील त्यांच्या कार्यालयातून ऑनलाइन सहभागी झाले होते. सभा सुरू असताना रमेश पुणेकर कॅमेऱ्यात सिगारेटचे झुरके सोडताना कैद झाले आहे.त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.

Share