भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीची नवी खेळी

मुंबई : राज्यात नुकतच नगरपंचायत निवडणूका पार पडल्या यात भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला मात्र महाविकास आघाडी स्वतंत्र निवडणुका लढली असल्यामुळे महाविकास आघाडीला अपेक्षित असं यश मिळाल नाही. त्यामुळे जास्तीत जास्त ठिकाणी नगराध्यक्षपद मिळवून सत्ता महाविकास आघाडीकडे राहावी यासाठी तिन्ही पक्षांनी स्थानिक पातळीवर एकत्र येण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. तसे पत्रकच तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या सहीने काढण्यात आले आहे.

महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. राज्याच्या हिताच्या व महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या उत्कर्षासाठी महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आली. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष मिळून आज सुयोग्यरित्या महाराष्ट्रातील जनतेला समान विकास कार्यक्रम अंतर्गत सक्षमरित्या कार्य करीत आहेत.

महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून आज आपण सर्वजण पहिल्यांदाच १०६ नगरपंचायतीच्या व भंडारा गोंदिया जिल्हा परिषद तसेत १५ नगर पंचायत समित्या निवडणुकीला सामोरे गेलो. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला भरघोस यश जनतेने दिले’ असं म्हणत महाविकास आघाडीने राज्यातील जनतेचे आभार मानले.

तसंच, नगरपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मिळालेले यश आपल्याला कायम ठेवायचे आहे व जनतेने दाखवलेल्या विश्वास हा पुन्हा त्यांना समान विकास कार्यक्रमानुसार, विकास स्वरूपात पुन्हा द्यावयायचा असेल तर आपल्याला प्रत्येक नगरपंचायतीमध्ये आघाडीचा नगराध्यक्ष होणे देखील अत्यावश्यक आहे. तरी आपण सर्वांनी याकरिता स्थानिक पातळीवर प्रामाणिक प्रयत्न करावेत व महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाच्या निवडून आलेल्या सदस्यांना विश्वासात घेऊन जास्तीत जास्त नगराध्यक्ष महाविकास आघाडीचे निवडून येतील प्रयत्न करावेत’ असे आदेश महाविकास आघाडीने आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहे.

Share