राजकारणात करिअर बनवण्यासाठी आलेलो नाही; Nitin Gadkari

तप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संबंधांची बरीच चर्चा होत असते. मात्र आता या सर्व चर्चांवर नितीन गडकरी यांनी उत्तर दिलं आहे. नितीन गडकरी यांच्या नावाची कायम पंतप्रधानपदासाठी चर्चा होत असते, त्याबद्दल विविध अटकळीही बांधल्या जातात. मात्र आता गडकरी यांनी या विषयावरही भाष्य करत पंतप्रधानपदाबाबत रोखठोक मत व्यक्त केलं. ‘ मी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत कधीही नव्हतो. मी आज जो काही आहे, तसा  संतुष्ट आहे. भाजपचा कार्यकर्ता म्हणून मी दृढ विश्वासाने काम करतो, ‘ असं स्पष्ट मत नितीन गडकरींनी मांडलं. एका वृत्तपत्राल दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी पंतप्रधानबाबत स्पष्ट भाष्य केलं.

या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक विषयावर दिलखुलासपणे उत्तर दिली. कोणत्याही मतभेदाच्या बातम्यांनाही त्यांनी त्यांच्या भाष्यातून पूर्णविराम दिला. मी राजकारणात करिअर बनवण्यासाठी आलेलो नाही. मी तळागाळातील कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि संघ स्वयंसेवक राहणे पसंत करतो, असे ते म्हणाले. भाजपचा कार्यकर्ता म्हणून मी काम करतो, हिशोब तपासत बसणारा नेता मी नाही. असे देखील ते म्हंटले. सबका साथ सबका विकास यावर माझा विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार हे अतिशय उत्तम काम करत आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही केंद्रात तिसऱ्यांदा सरकार स्थापन करू, असा विश्वासही नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

Share