मुंबई : वीज पुरवठा खंडित केलेल्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा पूर्ववत होणार असल्याची घोषणा, उर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज विधानसभेत केली आहे. बँकेचे कर्ज त्यामुळे महावितरणची परिस्थिती गंभीर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, शेतकऱ्यांच्या हातात पीक येईपर्यंत वीज तोडणी तीन महिने तात्पुरती थांबवली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
विरोधीपक्षाकडून वारंवार शेतकऱ्यांच्या वीजेचा प्रश्न यंदाच्या अधिवेशनात मांडण्यात आला होता. मागील अधिवेशनात अजित पवार यांनी घोषणा केली असताना देखील वीज पुरवठा खंडित केल्या जात होता. तसेच वीजेचं कनेक्शन तोडलं जात होत. त्यावर आज उर्जामंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. तुर्तास कोँणत्याही शेतकऱ्यांची वीज तोडली जाणार नाही आणि तोडलेले वीजेचे कनेक्शन वापस जोडल्या जाणार असल्याची घोषणा नितीन राऊत यांनी आज विधान सभेत केली आहे.