गॅस पाईपलाईन नको; आधी पुरेसं पाणी द्या – खा. जलील

औरंगाबाद : शहरातील नागरिकांना सात ते आठ दिवसानंतर पिण्याचे पाणी मिळते. सातारा- देवळाईसह बहुतांश भागात अद्याप नळ योजन नाही. तेव्हा संपूर्ण शहराला आधी वेळेवर पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी, मगच पाईपालाइने ग्रॅस देण्याचा विचार करा अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.  तसेच २ मार्च रोजी गॅस पाइपलाइनच्या उद्घाटनासाठी येणारे भाजपचे केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीप सिंग पुरी यांना काळे झेंडे दाखवून विरोध करणार असल्याचे ते म्हणाले.
औरंगाबादेत झालेल्या पत्रकार परिषेदत खा. जलील यांनी शहरातील अनेक योजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खा. जलील म्हणाले,  शहराचा गॅस पाईप लाईन हा मुद्दा नसून पिण्याच्या पाण्याचा मुख्य प्रश्न आहे. विकास आम्हालाही हवा आहे. परंतू गॅस पाईप लाईन हा विकास नाही. केंद्र सरकार ४,००० हजार कोटी खर्चून गॅस पाईप लाईन शहरात टाकत आहे. परंतु या गॅस पाईप लाईनमुळे शहराचा कोणताही विकास होणार नाही. कारण सध्या शहरासाठी या पाईप लाईनची काहीही आवश्यकता नाही. शहराचा पाणी हा मुख्य प्रश्न आहे. गॅस पाईप लाईनमुळे शहरातील सर्व रस्ते खोंदल्या जाणार आहे. यामुळे शहरातील रस्त्यांची बिकट अवस्था होईल आणि नागरीकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागणार आहे. लोकांच्या या फसवणुकी विरोधात आम्ही आवाज उठवणार आहोत. आणि लोकांच्या मूलभूत प्रश्नासाठी शेवटपर्यंत लढणार आहोत. गॅस पाईप लाईनमुळे अनेकांना मोठा फायदा होणार आहेत. राजकारणी लोकांच्या जवळ असलेल्या लोकांसाठी मोठा आर्थिक फायदा व्हावा, यासाठी ही योजना बनवण्यात आली आहे. यामुळेच काही लोकांच्या फायद्यासाठी ही योजना शहरातील लोकाच्या माथी मारवली जात आहे. या योजनेचा शहराला कोणताही फायदा नसून फक्त राजकारणी लोकांच्या आर्थिक फायद्यासाठी ही योजना बनवण्यात आल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यानी लावला.
जलील पुढे  बोलताना म्हणाले की, गॅस पाइपलाईनप्रमाणेच मेट्रो डीपीआर हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा शहराला कोणताही फायदा होणार नाहीत.  मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र सरकार कोणताही निधी देत नाही. सर्व मेट्रोचा आर्थिक भार हा महानगर पालिकेवर असतो. यामुळे आधीच औरंगाबाद मनपा तोट्यात असताना या प्रकल्पाची शहराला काय गरज आहे. यामुळे मनपाची सर्व आर्थिक स्थिती बिघडणार आहे. नागपूर मेट्रोचा शहराला कोणताही फायदा झाला नाही. परंतु नितीन गडकरी यांच्या नावासाठी हा प्रकल्प यशस्वी म्हणून दाखवण्यात येत आह. अशीच अवस्था हैदराबाद मेट्रोची ही आहे. त्यामुळे शहरात गॅस पाईप लाईन आणि मेट्रो सारखे निरर्थक खर्च करणारे प्रकल्प शहराला नको आहे. त्या यावेजी पिण्याच्या पाण्याचा आणि गरजू लोकांना घराची जास्त आवश्यकता आहे, असे खासदार जलील म्हणाले.
शहराच्या महसुलावर बोजा उत्पन्न करणाऱ्या योजनेच्या निषेधार्थ, गोरगरीब जनतेला घर मिळणार अशा खोट्या आश्वासनाच्या विरोधात आणि घरकुल योजनेच्या भोंगळ कारभार विरोधात २ मार्च रोजी केंद्रीय मंत्री हरदिप सिंह पूरी यांचा निषेध म्हणून काळे झंडे दाखवण्यात येणार आहे, अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
Share