एटीएम मधून पैसे काढण्यासाठी कार्डची गरज नाही

दिवसेंदिवस फसवणुकीचे गुन्हे वाढत आहेत यावर उपाय म्हणून आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आता डेबिट कार्ड शिवाय पैसे काढण्याची सुविधा सर्व बँकेत उपलब्ध करून दिली जाईल अस सांगितल आहे. यापूर्वी ही सुविधा काही बँकांमध्ये उपलब्ध होती पण आता सर्व बँकांमध्ये UPI च्या मध्यमातून पैसे काढता येणार आहेत.

यामुळे कार्डचे क्लोन करून फसवणूक करणाऱ्यांचे प्रमाण कमी होईल रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या चलनविषयीच्या धोरण समितीच्या बैठकीत रिजर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हरर्नर शक्तिकांत दास यांनी चलनविषयक धोरण जाहीर केले,या धोरणानुसार MPC दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही त्याचबरोबर रेपो रेट आणि रिर्वस रेपो रेट ही अनुक्रमे 4 टक्के आणि ३,३५ टक्के ठेवण्यात आला आहे. आरबीआयने यापूर्वी २० मे २०२२ मध्ये शेवटचा रेपो रेट मध्ये बदल केला होता.

आता २०२२ -२३ या चालू आर्थिक वर्षात जीडीपी चा दर ७.८ टक्क्यावरून वरुन ७.२ टक्के  असा ठेवण्यात आला आहे. या पूर्वी २०२०-२१ या आर्थिक वर्षात जीडीपी वाढीचा अंदाज ९.८ टक्के ठेवण्यात आला होता. यावर्षी महागाईचा सरासरी दर हा सरासरी ५.७ टक्के ठेवण्यात आला आहे. महागाईचा हा दर एप्रिल-जून मध्ये ६.३ टक्क्यांवर जाणार तर जुलै- सप्टेंबरमध्ये हा दर ५ टक्क्यांवर येणार असा अंदाज वर्तवला जात आहे.

 

Share