मुंबई : आर्थिक वर्ष २०२२-२३ साठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केला आहे. अर्थसंकल्पातून करदात्यांना कोणताच दिलासा मिळालेला नाही. तर दुसरीकडे महागाईने होरपळलेल्या नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्नही या अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी प्रक्रिया दिली आहे.
अर्थसंकल्प नव्हे निवडणूक संकल्प!#Budget2022
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) February 1, 2022
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये जयंत पाटील यांनी केवळ एकच वाक्य लिहिलं आहे. ‘अर्थसंकल्प नव्हे निवडणूक संकल्प!’. एका वाक्यात आपली प्रतिक्रिया देत जयंत पाटील यांनी या अर्थसंकल्पावर टीका केली आहे.
देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. येत्या काही दिवसांत या निवडणुकीसाठी मतदान सुद्धा होणार आहे. त्यामुळे या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारने हा अर्थसंकल्प सादर केला असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे.