Budget 2022: काय आहे डिजिटल युनिव्हर्सिटी ?

दिल्ली- यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्प २०२२-२३ मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी इतर काही नव्या संकल्पनांचा वापर अर्थसंकल्पीय भाषणात केला आहे. यामध्ये ‘गती-शक्ती’सारख्या उपक्रमांसोबतच ‘डिजिटल युनिव्हर्सिटी’चा देखील उल्लेख त्यांनी केला. सध्या कोरोनामुळे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण व्यवस्थेचा डोलारा तोलून धरला असताना आता डिजिटल युनिव्हर्सिटीची नवी संकल्पना देशात अंमलात आणण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे.

डिजिटल युनिव्हर्सिटी म्हणजे काय?

केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे ही डिजिटल युनिव्हर्सिटी हब अँड स्पोक मॉडेलवर आधारीत असेल. अर्थात, या विद्यापीठाचं एकच केंद्र असेल जिथे सर्व अध्यापनाचा डेटा तयार होईल. तिथून तो देशभरातील दूर्गम भागात असलेल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.  विद्यार्थ्यांनी या साखळीतील शेवटच्या टप्प्यात या ज्ञानाचा किंवा अभ्यासक्रमाचा वापर करून अध्ययन करणे याला ‘स्पोक्स’ म्हणण्यात आलं आहे.

दरम्यान, या हबच्या माध्यमातून तयार होणारी माहिती ही विद्यार्थ्यांना प्रादेशिक भाषांमधून उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे प्रादेशिक भाषांना बळ देण्याचा देखील यातून प्रयत्न होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

डिजिटल विद्यापीठातील सुविधा-

  • वन क्लास वन टिव्ही चॅनेल
  • विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पहिली ते बारावी साठी  चॅनेल सुरु करणार
  • त्याची संख्या २०० पर्यंत वाढवणार
  • प्रादेशिक भाषांमध्ये हे चॅनेल काम करतील
  • यासाठी इंटरनेट रेडिओ आणि डिजीटल साधनांचा वापर
  • डिजीटल विद्यापीठांशी देशातील नामांकित विद्यापीठांचे करार असणार
Share