पटोलेंची जीभ पुन्हा एकदा घसरली

मुंबई : काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मी मोदींना मारु शकतो, शिवा देऊ शकतो असं वक्तव्य  केले होते. त्यावर राज्यातील भाजपकडून रान पेटविण्यात आले होते. आता तो मुद्दा शांत होत असताना नाना पटोलेंनी पुन्हा एकदा  नाना पटोले यांनी पुन्हा एकदा नवा वाद ओढवून घेतला आहे. ज्याची बायको पळते, त्याचं नाव मोदी ठरतं असे त्यांनी म्हटले आहे, त्यावरून पुन्हा एकदा नवा वाद उद्‌भवण्याची चिन्हे आहेत.

नाशिकच्या इगतपुरीमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात बोलताना पटोले यांनी केंद्र सरकारवर टिका केली आहे.  पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की,  गावगुंडांना गावगुंडच दिसतील. त्यांची आता हलाकीची स्थिती निर्माण झाली असून, लोक भाजपवर हसू लागले आहेत. ज्याची बायको पळते, त्याचे नाव मोदी ठरते. असे हे झाल्यावर आता काम बाकी राहिल, असे सांगत त्यांनी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका केली. काही दिवसांपूर्वीच पटोले यांनी कार्यकबोलताना भी मोदीला मारू शकतो, शिनीगाळही करू शकतो’, असे म्हटले आहे.

नाना पटोले म्हणाले, जनतेचे मूळ मुद्दे बाजूला सारण्याचं काम सुरू आहे. जगाच्या पाठीवर आपल्या देशाची ओळख बेरोजगारांचा देश अशी झालीय. महागाई मोठ्या प्रमाणात वाढलीय. सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल झालंय. शेतकऱ्यांचे प्रश्न आज मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. छोट्या व्यापाऱ्यांचे प्रश्न निर्माण झाले आहेत. केंद्रातील सरकार सपशेल अपयशी झालेलं सरकार आहे.

Share