पवार हुशार राजकारणी असून…चंद्रकांत पाटलांचा टोला

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे हुशार राजकारणी असून वेळ बरोबर मारून नेतात असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्टिट करुन अजित पवारांना लागवला.

चंद्रकांत पाटील आपल्या ट्टिट मध्ये म्हणतात, काँग्रेसचे २५ ते २६ आमदार नाराज आहेत. शिवसेनेच्या इतर अनेक आमदारांनी आपली नाराजी उघडपणे मांडत अर्थसंकल्पीय सत्रात बसणार नाही असे निवेदन उध्दव ठाकरे यांना दिले. त्यामुळे या आमदारांची समजूत काढण्यासाठी २ हजार कोटींचा निधी देण्यात आला. असा निधी देता येत नाही. परंतु, अजित पवार हे अतिशय हुशार राजकारणी असून वेळ बरोबर मारून नेतात. असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

तसेच यावेळी त्यांनी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधला. करुणा शर्मा यांनी ज्यावेळी परळीमध्ये जाऊन न्याय मागण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस त्यांच्या गाडीच्या डिकीत रिव्हाॅल्वर ठेऊन त्यांना १५ दिवस तुरूंगात टाकलं. न्यायासाठी करूणा शर्मा यांनी अक्षरशः आक्रोश करूनही त्यांना न्याय मिळाला नाही. असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

 

Share