नाना पटोलेंचे वकील सतीश उके ईडीच्या ताब्यात

नागपुर : नागपुरातील बहुचर्चित अ‍ॅड. सतीश उके यांच्या घरावर आज सकाळी केंद्रीय तपास संस्थेचा छापा टाकला आहे. त्यानंतर आता अ‍ॅड. सतीश उके ईडीने आपल्या ताब्यात घेतले आहे. अ‍ॅड. सतीश उके हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील आहेत. सतीश उके यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती. त्यामुळे ते अधिक चर्चेत आले होते.

आज सकाळीच ईडीच्या अधिकाऱ्यांनी उके यांच्या नागपुरातील पार्वतीनगरातील घरी छापेमारी सुरू केली. काही अधिकारी हे उके यांच्या घरी पोहोचले होते. यावेळी महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ईडीचे ९ अधिकारी आणि २ महिला अधिकारी उके यांच्या घरात दाखल होते. तसंच सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले होते. सतीश उके यांच्या घराबाहेर परिसराला छावणीचं स्वरुप आलं आहे.

Share