पवार साहेब तुमचे डायरेक्ट दाऊद सोबत संबंध नाही ना? राणेंंचा निशाणा

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने अटक केली. आता या प्रकरणात मलिकांच्या आणखी वाढ होताना दिसत आहे. मुंबईतल्या गोवावाला कम्पाऊंडला हडप करण्यासाठी नवाब मलिक यांचे दाऊदच्या टोळीशी थेट संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे आहेत, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. यावरुन भाजप नेते निलेश राणे यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

निलेश राणे आपल्या ट्वीट मध्ये म्हणात, पवार साहेब तुमचे डायरेक्ट दाऊद सोबत संबंध नाही ना? नवाब मलिक मधला असू शकतो. राजकारणात जेव्हापासून आलो तेव्हापासून चा हा संशय आहे कारण मुंबई बॉम्ब ब्लास्ट घटनेपासून तुम्ही एक वाढीव बॉम्ब ब्लास्ट जाहीर केला तो नेमका कोणाला वाचवण्यासाठी होता? तेव्हा मीडिया वेगळी होती, तुम्ही वाचलात. असे ट्वीट करत निलेश राणे यांनी शरद पवारांना सवाल उपस्थित केला आहे.

दरम्यान विशेष कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी या आरोपपत्राची दखल घेताना स्पष्ट केलं की, नवाब मलिक यांनी डी कंपनीशी संबंधित असलेल्या हसिना पारकर, सलीम पटेल, सरदार खान यांच्यासोबत मनी लाँड्रिंगसाठीच गोवावलाल कंपाऊंडच्या अफरातफरीचा हा कट रचला. ज्यातनं या सर्वांनी मोठा आर्थिक घोटाळा करून बेहिशेबी मालमत्ता जमवली. त्यामुळे पीएमएलए कायद्यानुसार हे सर्व आरोपी या गुन्ह्याशी थेट संबंधित असल्यानं शिक्षेसाठी पात्र आहेत. त्यानंतर ती भाडेपट्टी अस्लमच्याच नावावर करण्यात आली.

Share