राज्यात मध्यावती निवडणुका लागण्याची शक्यता; ठाकरेंचं भाकीत

मुंबई : राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता असल्याचं भाकीत शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. संपर्कप्रमुखांच्या मेळाव्यात बोलताना ठाकरेंनी यांनी याबाबत भाष्य केले आहे. तसेच निवडणुकांच्या तयारीला लागा अशा सूचनाही उद्धव ठाकरे यांनी संपर्कप्रमुखांना दिल्या आहेत.

राज्यामध्ये राजकीय परिस्थिती अस्थिर झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही मोठ मोठ्या घोषणा करायला सुरुवात केली आहे. राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका लागतील. आपल्याला प्रत्येकाच्या घराघरात पोहचला हवं. आपला मुख्यमंत्री असताना केलेले काम घराघरात पोहचवा. राज्यात मध्यवधी निवडणुका लागतील, त्याला तयार राहा, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी विधानसभा संपर्कप्रमुखांना दिल्या आहेत. केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी नवीन घोषणा केल्या आहेत. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुका लागू शकतात, असे ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे म्हणाल्या.

दरम्यान, खासदार अरविंद सावंत यांनीही उद्धव ठाकरे यांच्या या संकेताला दुजोरा दिला आहे. २०१४ पूर्वी गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुका एकाचवेळी झाल्या होत्या. पण २०१२ नंतर विधानसभेची निवडणूक लागली. तेव्हा हिमाचल प्रदेशची निवडणूक आधी झाली. नंतर गुजरातची झाली. मधल्या काळात बऱ्याच घोषणा झाल्या. घोषणा झाल्या आणि निवडणुका लागल्या. आताही तेच होण्याची शक्यता आहे, असं अरविंद सावंत म्हणाले.

Share