Vegetable prices : सततच्या पावसामुळे भाज्यांचे दर गगनाला

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोसळणार्‍या पावसामुळे सर्वाधिक नुकसान भाज्यांचे झाले आहे. जाग्यावरच फळभाज्या आणि पालेभाज्या खराब झाल्याने बाजारातील आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. परिणामी मागणी अधिक आणि आवक कमी अशी परिस्थिती निर्माण झाल्याने भाज्यांचे दर गगणाला भिडले आहेत.

सतत सुरू असलेल्या पावसाचा परिणाम सर्वत्र जाणवायला लागला. याचाच परिमाण राज्यातील बाजारावर झालेलाच दिसून येत आहे. पावसामुळे पालेभाज्‍या सडल्‍या आहेत. यामुळे सध्या बाजारात पालेभाज्यांची आवक कमी झाली असून भाज्यांचे दर वाढले आहे. सद्यस्थितीत बाजारात मेथी, पालक, कोबी, कोथिंबीर यासह इतर भाज्यांचे दर प्रत्येकी दहा ते पंधरा रुपयांनी वाढले आहे. त्यामुले सर्वसाधारण कुटुंबातील गृहिणीचे बजेट कोलमडले आहे.

भाज्यांचे दर (किलो)

भाजी                 आता किलोचे दर           
भेंडी                     ४० रुपये
टोमॅटो                  ४० रुपये
कोथिंबीर जुडी       ६०-७० रुपये
मेथी जुडी             ७० रुपये
पालक जुडी          ५० रुपये
फ्लॉवर                ६० रुपये
ढोबळी मिरची      ९० रुपये
गवार                  ६०  रुपये
लिंबू                   ३० ते ४० रुपये

Share