दिल्ली- पंतप्रधान मोदी यांनी काल केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्रातलं राजकारण पुन्हा एकदा पेटलं आहे. मोदींच्या त्या वक्तव्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक पाहायला मिळतेय. महाराष्ट्र काँग्रेसने मजुरांना स्थलांतर करण्यासाठी भाग पाडलं, त्यासाठी मोफत तिकीटं त्यांना देण्यात आली, असा आरोपही नरेंद्र मोदींनी केला होता . राष्ट्रपतींच्या अभिभाषणेवर झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते संसदेत बोलत होते. यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही पंतप्रधान मोदींच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे.
देशाच्या मा. प्रधानमंत्र्यांनी काल लोकसभेत एक तासाचे भाषण केले. यामध्ये त्यांनी कोरोना, रोजगार, महागाई अशा विविध विषयांवर देशाला एक दिशा द्यावी अशी अपेक्षा होती. दुर्दैव की प्रधानमंत्री आपल्या महाराष्ट्राबद्दल बोलले. ही दुःख देणारी गोष्ट आहे. – खा. @supriya_sule
— NCP (@NCPspeaks) February 8, 2022
पंतप्रधान मोदींच्या दीड तासांच्या भाषणाकडे खूप अपेक्षेने मी पाहत होते. कारण कोरोनाच्या महामारीतून आपण बाहेर पडत आहोत. राज्ये अडचणीत आहेत, कोरोनाची तिसरी लाट ओरसत आहे , चीनचा महत्त्वाचा मुद्दा आहे, नवीन नोकऱ्या निर्माण होत नाहीयेत या सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे ते भाषण आम्ही ऐकत होतो. पंतप्रधान आपल्या महाराष्ट्राबद्दल जे बोलले त्याचे मला स्वतःला वैयक्तिकपणे दुखः वाटले आहे. आपल्या राज्याबद्दल पंतप्रधान असे का बोलत आहेत याच्या मला वेदना झाल्या .
नरेंद्र मोदी हे फक्त भाजपाचे नाही तर संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत. एका पक्षाच्यावतीने आणि एका राज्याच्यावतीने देशाचे पंतप्रधान बोलतात त्याचे फार दुःख झाले. पंतप्रधानपद हे पक्षाचे नाही तर संविधानिक पद आहे – खा. @supriya_sule #महाराष्ट्रद्रोही_bjp
— NCP (@NCPspeaks) February 8, 2022
राज्याने भाजपाला १८ खासदार निवडून दिले आहेत आणि मोदी पंतप्रधान असण्यामागे महाराष्ट्रातील मतदारांचाही मोठा वाटा आहे. त्या मतदारांचा आणि महाराष्ट्राचा अपमान पंतप्रधान मोदींनी कोविड सुपर स्प्रेडर म्हणून केला आहे. हे खूप धक्कादायक आहे,” असे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले. एका पक्षाच्यावतीने पंतप्रधान बोलत होते हे पाहून मला दुखः झाले. पंतप्रधानांचा मान सन्मान सगळ्यांनीच केला पाहिजे आणि त्यामध्ये पक्ष येत नाही. ते पद पक्षाचे नाही. त्यामुळे कालच्या एकंदर भाषणावरून प्रधानमंत्रीजी आपसे नाराज नहीं,हैरान हू मैं असे सुप्रिया सुळे यांनी म्हंटले आहे.