अभिमानास्पद ! जगातील सुंदर पर्यटनस्थळांच्या यादीत सिंधुदुर्ग जिल्हाच्या समावेश

मुंबई-  कोंड नेस्ट ट्रॅव्हलर या मॅगझिनने यावर्षीच्या भेट देण्यासाठी जगातील ३० सर्वात सुंदर पर्यटनस्थळांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये लंडन, सिसिली, सिंगापूर यासह इस्तंबूल, इजिप्त, माल्टा, सर्बिया, केपवर्दे अशा आंतरराष्ट्रीय तसेच सिक्कीम, मेघालय, ओरिसा, राजस्थान, गोवा, कोलकाता, भिमताल, केरळमधील आयमानम अशा भारतीय ९ पर्यटन स्थळांत महाराष्ट्रातील एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे.

जगातील सर्वात सुंदर ३० पर्यटन स्थळांच्या यादीमध्ये सिंधुदुर्गचा समावेश असणे ही खरोखरच आपल्यासाठी मोठी आणि अभिमानाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.

या यादीमध्ये श्रीलंका, भूतान, कतार, जपान, युएई, इजिप्त, ओक्लाहोमा, सेऊल, गोबन, उझबेकिस्तान यासारख्या पर्यटनस्थळांचा समावेश आहे. आता या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटनस्थळांच्या यादीत सिंधुदुर्गचा समावेश झाला आहे.

Share