पं. शिवकुमार शर्मा यांच्या निधनाने सांस्कृतिक विश्वाची मोठी हानी : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : संतूरवादनाला जगभरात प्रतिष्ठा मिळवून देणारे ज्येष्ठ संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा (वय ८४ वर्षे) यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. देशातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी पं. शिवकुमार शर्मा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील शिवकुमार शर्मा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पं. शिवकुमार शर्मा यांच्या निधनाने आज आपल्या देशाच्या सांस्कृतिक विश्वाची मोठी हानी झाली आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे.

https://twitter.com/narendramodi/status/1523927993848107010?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1523927993848107010%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fmanoranjan%2Fpandit-shivkumar-sharma-passed-away-84-pm-narendra-modi-nitin-gadkari-tribute-yst88

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, ”आज आपल्या देशाच्या सांस्कृतिक विश्वाची मोठी हानी झाली आहे. आपण पंडित शिवकुमार शर्मा यांना गमावले आहे. त्यांच्या जाण्यानं तीव्र वेदना झाल्या आहेत. संतूरवादनानं ते जगभर ओळखले गेले. त्यांनी आपल्या अद्भुत संतूरवादनानं या वाद्याला वेगळी ओळख निर्माण करुन दिली. भारतीय संगीत विश्वात भरीव कामगिरी करण्यात त्यांचे योगदान मोठे होते. त्यांनी निर्माण केलेल्या कलाकृती, त्यांच्या संगीतरचना या नव्या पिढीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरणार आहेत. त्यांचे कर्तृत्व कधीही विसरता येणार नाही. मी त्यांच्या कुटुंबीयाप्रती सहानुभूती व्यक्त करतो आहे. ओम शांती”, अशा शब्दांत मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील शिवकुमार शर्मा यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर व्टिट करताना म्हटले आहे की, पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा यांच्या निधनाची बातमी कळताच धक्का बसला आहे. त्यांचे जाणे दु:खदायक आहे. संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते शिवकुमार शर्मा यांच्यासोबत माझे घनिष्ठ संबंध होते. संगीतविषयक अनेक गोष्टींवर चर्चा होत असे. आपल्या संतूरवादनानं एक वेगळा विचार त्यांनी श्रोत्यांना दिला. आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीतील संतूरवादनानं त्यांनी श्रोत्यांना जिंकून घेतले होते. दरम्यान, पंडित शिवकुमार शर्मा यांच्या निधनाचे वृत्त कळताच भारतीय संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पं. शिवकुमार शर्मा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

https://twitter.com/nitin_gadkari/status/1523928494966996992?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1523928494966996992%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.esakal.com%2Fmanoranjan%2Fpandit-shivkumar-sharma-passed-away-84-pm-narendra-modi-nitin-gadkari-tribute-yst88

Share