पोलिसांना १० मिनिटे बाजूला करा, ओवैसीला औरंगजेबाकडेच पाठवतो!

मुंबई : एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी हे गुरुवारी औरंगाबादेत आले आणि त्यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. यावरुन सर्वच राजकीय पक्षांनी ओवैसींवर निशाणा साधला आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करीत प्रखर टीका केली.

तर..आम्ही शिवरायांचे मावळे नाही!
भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी याबद्दल ट्वीट करत ओवैसीला इशारा दिला आहे. “मी आव्हान करतो, पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा.. याला औरंगजेबाकडे नाही पाठवला तर..आम्ही शिवरायांचे मावळे नाही!!!” असं ट्वीट करत त्यांनी इशारा केला आहे.

..हे तर नामर्दांचे सरकार : नितेश राणे
नितेश राणेंच्या दुसऱ्या ट्विटमध्ये असं म्हटलंय की, “या कारट्या ओवैसीला माहिती आहे का? की, मी औरंगजेबाच्या थडग्या समोर नागडा नाचलो तरी, मला दोन पायावर महाराष्ट्रात फिरता येईल.. कारण राज्यामध्ये “नामर्दांचे सरकार आहे”…” असं म्हणत त्यांनी सरकारवरही टीकास्त्र सोडलं आहे. त्याबरोबर शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनीही ओवैसी यांच्यावर टीका केली आहे.

ओवेसींवर कारवाई करा, अन्यथा…
एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी गुरुवारी शेकडो कार्यकर्त्यांसह औरंगाबादेतील विविध धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. पाणचक्की, दौलताबाद, खुलताबाद येथील दर्ग्यांना तसेच औरंगजेबाच्या कबरीला त्यांनी भेट दिली. यावरून मनसेही आक्रमक झाली आहे. राज्य सरकारने अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा महाराष्ट्रात असंतोषाचा भडका उडाला तर त्यासाठी राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा मनसेचे नेते गजानन काळे यांनी दिला.

Share