अमृता फडणवीस यांच्या ट्वीटला मनिषा कायंदेंचा पलटवार

मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकारवर कोणत्या कोणत्या मुद्यावरून टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचले आहे. काल शिवसेना खा. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्लाबोल केला.  यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी खा. संजय राऊत यांची खिल्ली उडवली होती. तर, ‘शेर की दहाड से डरी हूई बिल्लीया’ म्हणत शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी जशास तसे उत्तर दिले आहे.

अमृता फडणवीस यांच्या या ट्वीटला शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. ‘शेर की दहाड से डरी हूई बिल्लीया आवाज निकालाने की कोशीष कर रही है। मामी गप्प बसा!’ अशा शब्दांत कायंदे यांनी जोरदार पलटवार केला आहे.

अमृता फडणवीस यांचं ट्वीट काय?

अमृता फडणवीस यांनी ट्वीटरच्या माध्यमातून त्यांनी संजय राऊत यांना टोमणा मारला. आज फिर एक बिल्लीने दहाडनेही कोशिश की है… असं सूचक वक्तव्य त्यांनी ट्वीटरद्वारे केलं. त्यांच्या या ट्वीटची प्रचंड चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आणि एकूणच राज्यभरातील लोकांमध्ये होऊ लागली आहे. शिवसेनाचा वाघ म्हणवणाऱ्या संजय राऊत यांना अशा प्रकारे बिल्ली संबोधल्यामुळे अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

 

Share