कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना इशारा नाही तर धमकी देतोय – राऊत

मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील जत तालुक्यातील ४० गावांवरही दावा करण्याची तयारी बोम्मई सरकारने केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. या सगळ्या मुद्द्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा, असा इशाराच राऊतांनी दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले की, सरकार कमजोर असेल महाराष्ट्राचे, सरकार मिंधे असेल, पण आजही शिवसेना राज्यावर आलेले प्रत्येक संकट परतावून लावू. रक्त सांडवण्याची वेळ आली तर तेही करू. १०६ हुतात्म दिले आहे. बाळासाहेब ठाकरेंनी तुरुंगवास भोगला आहे, आम्हीही भोगो. शिवसेनेकडून धमकी देतोय, महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर याद राखा, हा इशारा नाही धमकी देतोय, असंही राऊत यांनी ठणकावून सांगितलं.

४० आमदारांचा गट आहे. स्वाभिमानासाठी शिवसेनेतून बाहेर पडला, आता कुठे गेलं तुमचं स्वाभिमान, कुठे शेण खात आहे. एक कर्नाटकचा मुख्यमंत्री राज्यातील ४० गाव खेचून घेण्याचा प्रयत्न करतोय. दुसरा मुख्यमंत्री उद्योग पळवून नेतो. षंढा सारखे बसला तुम्ही, अशी तिखट टीकाही राऊत यांनी शिंदेंवर केली.

आमचे सत्ताधारी आज गुडघ्यावर बसले असेल XXX वर करून, तरीही शिवसेना ही स्वाभिमानाने उभी आहे महाराष्ट्रामध्ये. मी सीमा भागात गेलो आहे, आताही परत जाईल. मी XX नाही, शिवसेना XXX ची अवलाद नाही. मी परत सांगतो. मुख्यमंत्र्यांकडे सीमाभागाचा भार होता तर १० वर्षामध्ये का गेला नाही. तिथे किती मंत्री गेले आतापर्यंत, चंद्रकांत पाटील तिथे जातात आणि कन्नड राष्ट्रगीत म्हणतात. तिकडेच त्यांचं कौतुक करून येतात, हे आमच्या जखमेवर मिठ चोळण्यासारखं आहे, अशी टीकाही राऊत यांनी केली.

Share