अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती अजूनही चिंताजनक

पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचे कौटुंबिक मित्र राजेश दामले यांनी दिलेल्या माहितीनुसार, विक्रम गोखले यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत. त्यांचे शरीर उपचारांना म्हणावा तसे प्रतिसाद देत नाही. त्यामुळे जोपर्यंत डॉक्टर काही सांगत नाही तोपर्यंत आम्ही काही बोलू शकत नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. असंही राजेश दामले यांनी सांगितलं.

विक्रम गोखले यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार ज्येष्ठ अभिनेत्याला ५ नोव्हेंबर रोजी या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यानंतर गुरुवारी पहिल्यांदा त्यांचे मित्र राजेश दामले यांनी समोर येत पत्रकारांना त्यांच्या आरोग्याविषयी माहिती दिली.

Share