मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग मिसींग लिंक प्रकल्प देशात पथदर्शी ठरेल – मुख्यमंत्री

मुंबई : जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात येणारा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाअंतर्गत मिसिंग लिंक प्रकल्प हा देशात पथदर्शी  प्रकल्प होणार असून लाखो प्रवाशांना फायदेशीर ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. डिसेंबर २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्णत्वास येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव या लांबीतील नवीन मार्गिकेच्या (मिसिंग लिंक) प्रकल्पाला भेट देऊन लोणावळा (सिंहगड संस्था) येथे सुरू असलेल्या बोगद्याच्या कामाची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

‘मिसिंग लिंक’ प्रकल्पात जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हे काम अतिशय आव्हानात्मक होते. लोणावळा तलावाच्या तळाखाली जवळपास ५०० ते ६०० फूट अंतरावर हा बोगदा आहे. बोगद्याची लांबी ८ कि.मी. असून जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा बोगदा बांधण्यात येत आहे. बोगद्याची रुंदी २३.७५ मीटर असून देशातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक रुंदीचा हा बोगदा आहे. मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई पुणे अंतर अर्ध्या तासाने कमी होणार आहे. बोगद्यामुळे घाटाचा भाग पूर्णतः टाळला जाऊन अपघात संख्येत मोठी घट होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

या प्रकल्पामुळे प्रवास सुखकर होणार आहे. वाहतूक कोंडी कमी होईल. त्याशिवाय प्रदूषण कमी होणार असून इंधनाची तसेच वेळेची बचत होईल. अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर. प्रवाशी, वाहने यांच्या सुरक्षेचा यामध्ये विचार करण्यात आला आहे. दरडी कोसळू नये यासाठी सर्वत्र ‘रॉक बोल्ट’ करण्यात आले आहे. काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास बाहेर जाण्यासाठी प्रत्येक ३०० मीटरवर एक्झिट मार्ग तयार करण्यात आलेले आहेत. बोगद्याच्या भिंतीला ५ मीटरचे कोटिंग असणार असून त्यावर आगप्रतिबंधक कोटींग करण्यात येणार आहे. अत्याधुनिक हाय प्रेशर वॉटर मिक्स यंत्रणा असून त्यामुळे आग लागल्यास ही यंत्रणा त्वरित कार्यान्वित होऊन आग विझेल, अशीही माहिती त्यांनी दिली.

मीसिंग लिंक प्रकल्प 

खालापूर ते सिंहगड असा हा मिसिंग लिंक प्रकल्प असेल.

ता जर आपण पाहिले तर खालापूर ते सिंहगड पर्यंत चे अंतर हे १९ किलोमिटर इतके आहे.

मीसिंग लिंक प्रकल्प सुरू झाल्यानंतर हे अंतर १३.३० किलोमीटर इतके होईल.

एकंदरीत ६ किलोमिटर इतके अंतर या प्रकल्पामुळे कमी होईल तसेच घाटातील अपघात टाळण्यासाठी आणि शून्य अपघात रस्ता बनविण्यासठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला.

साधारण पाऊण तासाची बचत या मार्गामुळे वाचेल.

यातील बोगद्याची एकूण लांबी १०.५५ किमी, त्यापैकी २,५ किमी बोगदा लोणावळा तावलाच्या तळापासून १७५ मीटर खालून जातो.

हा आशिया खंडातील सर्वात रुंद बोगदा असून त्यांची रुंदी २३.७५ मीटर आहे.

एकूण २ ब्रीज, एकाची लांबी ९०० मीटर तर दुसरा केवळ स्टेन्ड ब्रीज ६५० मीटर लांब असेल.

प्रकल्प सुरू झाला मार्च २०१९ ला तर डेडलाईन आहे डिसेंबर २०२३ ची आहे.

Share