मशिदीवरील भोंगे हटवा, अन्यथा आम्ही दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावू- राज ठाकरे

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे हटविण्यासाठी महाविकास आघाडी सरकारला अल्टीमेटम दिला आहे. राज यांनी शिवतिर्थावरून ठाकरे सरकारला थेट आव्हानच दिलं आहे. “मशिदीवरील भोंगे खाली उतरवावेच लागेल. माझा प्रार्थनेला विरोध नाही. नाहीतर आजच सांगतो, आताच सांगतो. ज्या मशिदीच्या बाहेर भोंगे लागतील त्याच्यासमोर भोंग्यांच्या दुप्पट स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायचा.”

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील गुढीपाडवा मेळाव्यात बोलणार असल्याचं जाहीर केलं होतं. तब्बल दोन वर्षानंतर राज ठाकरे बोलणार असल्याने राज ठाकरे काय बोलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आणि अपेक्षेप्रमाणे राज यांची तोफ धडाडली. पुढे ते म्हणाले,  मी धर्मांध नाही. धर्माभिमानी आहे. माझा कुणाच्या प्रार्थनेला विरोध नाही. पण आम्हाला त्रास देऊ नका, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. आम्हाला लाऊडस्पीकरचा त्रास होतो. धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का? बाहेरच्या देशात बघा. युरोपात जा. तिथे मशीदीवर लाऊडस्पीकर नाही. तुम्हाला प्रार्थना करायची तर घरात करा, असं युरोपातील शासन आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

मदरशांवर धाडी टाका, मग समजेल…

पंतप्रधानांना विनंती आहे की, ईडीच्या धाडी टाकताना आधी झोपडपट्टीतील मदरश्यांवर धाडी टाका. पोलिसांकडे सर्व सोर्स आहेत. पाकिस्तानची गरज नाही. उद्या काही घडलं तर आवरता आवरता येणार नाही. पण आमचं लक्ष नाही. आपल्याला मते हवे आहेत. आम्ही झोपडपट्ट्या वाढवत आहोत. अनेक मशिदी आहेत. त्यात काय चाललंय हे समजत नाही. हे पाकिस्तानच्या प्रोत्साहानाने आलेले लोक आहेत. आमदार, नगरसेवक खासदारांना घेणं देणं नाही. आधार कार्ड आहे, रेशनकार्ड आहे. यांना य सर्व गोष्टी पुरवणारे आमचेच लोक. एकदिवस येईल सर्वांचे डोळे उघडेल हे काय करून ठेवलं. एकदा पोलिसांशी बोला. कानोसा घ्या. तुम्हाला धडकी भरेल. धडकी. पण आमचं लक्ष नाही, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

 

 

Share