रुपाली चाकणकर यांना कोरोनाची लागण

पुणे : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: चाकणकर यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. गेल्या काही दिवासापासून राज्यातील अनेक नेते कोरोनाच्या विळख्यात अडकताना दिसत आहे. सकाळीच राज्याचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली होती.

रुपाली चाकणकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, ‘सौम्य लक्षणे जाणवल्यामुळे कोरोनाची चाचणी केली असता माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी लक्षणे जाणवल्यास कोरोना चाचणी करून घ्यावी. लवकरच मी आपल्या सर्वांच्या सेवेत पुन्हा रुजू होईन. अशी माहिती त्यांनी दिली आहे.

शिवसेना नेत्यांच्या घरातही कोरोनाचा शिरकाव
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. संजय राऊत यांची आई, पत्नी, मुलगी, आणि पुतणीला कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

Share