सलमान खानच्या भावाचा संसार मोडला; लग्नाच्या २४ वर्षांनंतर विभक्त होणार सोहेल-सीमा

बॉलिवूडमधील खान फॅमिलीतील सलीम खानचा मुलगा, अभिनेता सलमान आणि अरबाज खानचा भाऊ सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा सचदेव खान यांनी लग्नाच्या २४ वर्षांनंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. सोहेल खान आणि सीमा खान १९९८ साली लग्नबंधनात अडकले होते. या दोघांनी त्यांच्यातील मतभेदांमुळे घटस्फोटासाठी अर्ज केला होता. त्यावर कोर्टाचे शिक्कामोर्तब झाले आहे. सोहेल खान आणि सीमा खान आज फॅमिली कोर्टाबाहेर दिसले. त्यांचे फॅमिली कोर्टाबाहेरचा व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

अभिनेता सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा सचदेव खान यांनी त्यांच्यातील मतभेदांमुळे घटस्फोटासाठी अर्ज केला होता. त्यांच्यात नेमके काय बिनसले याचे कारण अजून तरी गुलदस्त्यातच आहे. २४ वर्षापूर्वी सोहेल खान आणि सीमा यांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केले होते; पण आता त्यांनी त्यांच्यातील नाते संपवण्याचा निर्णय घेतला आहे. धर्म वेगवेगळे असल्यामुळे सोहेल आणि सीमा यांच्या लग्नात अनेक अडचणी आल्या. यामुळे मध्यरात्री मौलवीला बोलावण्यात आले आणि रात्रीच त्यांनी निकाह केला होता. त्यानंतर दोघांनी आर्य समाज मंदिरात दुसरं लग्न केलं. सीमाच्या आई-वडिलांचा लग्नाला विरोध होता.

खान फॅमिलीमध्ये काय सुरू आहे याकडे त्यांच्या चाहत्यांचे डोळे आणि कान लागलेले असतात. सोहेल खान हा बॉलिवूडमधील फारसा यशस्वी अभिनेता नसला तरी त्याच्या नावामागे असलेल्या ‘खान’ या नावाच्या टॅगमुळे तो नेहमीच चर्चेत असतो. सोहेल आणि सीमा यांच्यात गेल्या पाच वर्षांपासूनच खटके उडत होते. तेव्हापासूनच सीमा सोहेलपासून वेगळी बांद्राच्या फ्लॅटमध्ये राहत होती. सोहेल आणि सीमाला दोन मुले आहेत. सीमा आणि सोहेल एकत्र राहत नव्हते. त्यानंतरच त्यांनी घटस्फोटाची प्रक्रिया सुरू केली होती.

बाॅलिवूडमध्ये मागच्या काही काळात बरेच घटस्फोट झाले. अनेक नाती तुटली. संसार विखुरले गेले. आता या यादीत सलमानचा भाऊ सोहेल खान आणि त्याची बायको सीमा खान हेही आले आहेत. काही वर्षांपूर्वी सोहेलचा भाऊ अरबाज खान आणि मलायका अरोरा यांचाही घटस्फोट झाला होता. आता सोहेल आणि सीमा खान यांचा घटस्फोट हा खान कुटुंबासाठी मोठा आघात आहे. सलमानने या दोघांचे नाते टिकावे म्हणून खूप प्रयत्न केले होते; पण काही उपयोग झाला नाही.

एखाद्या सिनेमाच्या पडद्यावर शोभेल अशी सोहेल आणि सीमा यांची लव्हस्टोरी आहे. आज सोहेल आणि सीमा एकमेकांसोबत रहायला तयार नाहीत;परंतु २४ वर्षापूर्वी चित्र खूप वेगळे होते. तेव्हा ही जोडी एकमेकांशिवाय राहू शकत नव्हती. फॅशन डिझायनर बनण्यासाठी सीमा सचदेव ही दिल्लीहून मुंबईला आली होती. प्रसिद्ध फॅशन डिझायनर असलेली सीमा अभिनेता चंकी पांडे याची नातेवाईक आहे. चंकी पांडे याच्या साखरपुड्याच्या पार्टीत सोहेल आणि सीमा यांची ओळख झाली. मैत्रीतून प्रेम फुलले. सोहेल हा मुस्लिम तर सीमा हिंदू. याच कारणामुळे सीमाच्या कुटुंबीयांकडून सोहेलशी लग्नाला खूप विरोध होता. सीमाचे सोहेलला भेटणे बंद केले होते.

सीमा आणि सोहेलला त्यांच्या प्रेमापुढे धर्म, घरच्यांचा विरोध यांची काहीच पर्वा नव्हती. घरातून पळून जात त्यांनी लग्न करायचे ठरवले. सोहेल सीमाला पळवून घरी घेऊन आला. तेव्हा वडील सलीम खान यांनाही सुरुवातीला धक्का बसला; पण त्यांनी विरोध केला नाही. ते म्हणाले, सीमा या घरात राहील; पण त्यासाठी निकाह करावा लागेल. त्यासाठी मध्यरात्री साडेतीन वाजता मौलवींचं अपहरण करून सोहेल आणि सीमाने निकाह केला होता. निकाहानंतर हिंदू रिवाजाप्रमाणेही दोघांचा विवाह झाला. त्यांना निर्वाण आणि योहान अशी दोन मुले आहेत.

https://www.instagram.com/p/CQJ1JkHBj7T/?utm_source=ig_web_copy_link

प्रेमाच्या इतक्या परीक्षा दिल्यानंतर, सीमाच्या घरच्यांचा विरोध न जुमानता सोहेल आणि सीमा यांनी लग्न केले. २० वर्षे दोघे एकत्र राहिले. मग असे काय झाले की, त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला, असा प्रश्न दोघांच्याही चाहत्यांना पडला आहे. मात्र, अजून अधिकृत कारण समोर आलेले नाही. असे बोलले जात आहे की, सोहेल खान गेल्या काही वर्षापासून हुमा कुरेशीसोबत डेट करत आहे; पण अजूनही यातील तथ्य माहिती नाही. पाच वर्षापासून सीमा सोहेलपासून वेगळी राहत आहे. सोहेल आणि हुमा कुरेशी यांच्याबद्दल चर्चा सुरू झाली, तेव्हाच सीमा घर सोडून निघून गेली होती. हुमा आणि सोहेलची भेट सेलिब्रिटी क्रिकेटमध्ये झाली. हुमा सोहेलच्या क्रिकेट टीमची ब्रँड अँबेसिडर होती. तेव्हापासून दोघांचे नाव जोडले गेले, अशी चर्चा आहे.

Share