संभाजीराजेंची राज्यसभा निवडणुकीतून माघार ?

मुंबई : राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांपैकी सहाव्या जागेवर संभाजीराजे यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आणि सर्वपक्षीय आमदारांनी आपल्याला पाठिंबा द्यावा असं पत्रही त्यांनी लिहिलं. त्यानंतर शिवसेनेकडूनही संभाजीराजेंना ऑफर देण्यात आली. मात्र, संभाजीराजे यांनी ती ऑफर नाकारत अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.

मात्र, या साऱ्या घडामोडीनंतर संभाजीराजे यांनी निवडणुकीतून अचानक माघार घेतल्याची बातमी समोर येत आहे. याबाबत संभाजीराजे आज पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका जाहीर करणार असल्याची बातमी समोर येत आहे. संभाजीराजे राज्यसभा उमेदवारी अर्ज दाखल करणार नाही असे सूत्रांनी सांगितले आहे. विजयासाठी आवश्यक असलेले संख्याबळ जुळत नसल्याने त्यांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान संभाजीराजे यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. यामध्ये संभाजीराजे यांनी शिवसेनेच्या भूमिकेवषयी अप्रत्यक्षपणे का होईना, पण नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नजरेतलं स्वराज्य घडवायचे आहे.मी त्यांच्या विचारांशी कटिबद्ध असेन. मी फक्त जनतेशी बांधील आहे, असे संभाजीराजे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Share