संजय राऊतांची शिवसेनेतून हकालपट्टी करावी; भाजप नेत्याची मागणी

मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची शिवसेनेतून हकालपट्टी करावी अशी मागणी भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी केली आहे. संजय राऊत यांनी मराठा समाजाचा अपमान केला आहे.तसेच संजय राऊत यांनी मराठा समाजाची माफी मागावी अशी मागणी भापजचे नेते प्रसाद लाड यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

भाजप नेते प्रसाद लाड म्हणाले की, संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी सातत्याने मराठा समाज, मराठा मोर्चा, मराठा आरक्षण, मराठा आंदोलनचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे. आज तर संजय राऊत यांनी मर्यादा पार केल्या आहेत. कालचा महाविकास आघाडीचा नॅनो मोर्चा किती मोठा होता हे दाखवण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या मुंबईतील मोर्चाचा व्हिडीओ संजय राऊतांनी ट्वीट केला.

 

ज्या मोर्चामुळे मराठा समाजाला न्याय मिळाला तो मोर्चा जणू आपलाच असल्याचं संजय राऊतांनी दाखवलं. अशा प्रकारचं वाईट कृत्य संजय राऊत यांनी केलं. माझी मागणी आहे की संजय राऊत यांनी मराठा समजाची माफी मागवी, तुम्ही मराठा क्रांती मोर्चाची माफी मागावी, अशी मागणी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. माझी तर उद्धव ठाकरेंकडे मागणी आहे की संजय राऊतांची शिवसेनेतून हकालपट्टी करावी, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली.

Share