अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर ‘या’ जिल्ह्यातल्या शाळा बंद

लातूर : राज्यात पुढच्या ४८ तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. येत्या दोन दिवसामध्ये पावसाचा हा जोर कायम राहण्याची शक्यता असून अनेक ठिकाणच्या शाळा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.त्यानुसार लातूर जिल्ह्यातील इयत्ता १ पहिली ते १२ वी पर्यंतच्या शाळांना १५ आणि १६ जुलै रोजी अशी दोन दिवसांची सुटी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी जाहीर केली आहे.

दरम्यान, प्रादशिक हवामान मुंबईच्या वतीने लातूर जिल्ह्यात १४ जुलैला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे संभाव्य परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील १ ली ते १२ वीच्या सर्व माध्यमाच्या, व्यवस्थापनाच्या प्राथमिक, माध्यमिक शाळांनी १५ आणि १५ जुलै रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे. १७ जुलै रोजी रविवार असून, सलग तीन दिवस सुटी असणार आहे. दरम्यान, १८ जुलै सोमवारपासून नियमित वर्ग भरणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी आदेशात म्हंटले आहे.

या भागातल्या शाळा राहणार बंद

ठाणे, पालघर, नवी मुंबई, पनवेल या महापालिका क्षेत्रात आज हवामान विभागानं अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यानंतर या भागातल्या शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तर मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मुंबई विद्यापीठाने आज १४ जुलै २०२२ रोजीच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितलं.

Share