शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झालं आहे. वयाच्या ५२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.रमेश लटके कुटुंबासह दुबईत फिरायला गेले असताना काल सायंकाळी त्यांचं निधन झालं आहे. वयाच्या ५२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघातील विद्यमान शिवसेना आमदार रमेश लटके यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय. आमदार रमेश लटके कुटुंबीयांसह दुबईला गेले होते. तिथेच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे निधन झालंय. आमदार रमेश लटके यांच्या निधनाची माहिती मिळताच शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी तात्काळ शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळवली आहे.

सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष ते आमदार

रमेश लटके यांनी सार्वजनिक गणेश मंडळाच्या अध्यक्षपदापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. गटप्रमुख ते आमदार असा त्यांचा अफलातून राजकीय प्रवास होता. या प्रवासादरम्यान त्यांनी शाखाप्रमुख, नगरसेवक ही आणि अशी विविध पदं यशस्वीरित्या भूषवली. त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. लटके यांनी १९९७ ते २०१२ अशा सलग ३ वेळा नगरसवेक पद भूषवलं. त्यानंतर २०१४ मध्ये लटके यांनी पहिल्यांदा अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

Share