शिवसेनेची मोठी कारवाई; एकनाथ शिंदेंना गटनेते पदावरुन हटवलं

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे  यांना गटनेतेपदावरुन काढून टाकण्यात आलं आहे. अजय चौधरी यांना शिवसेनेचे नवे गटनेते बनवण्यात आल्याचं कळतं आहे. एकनाथ शिंदे यांना शिवसेना नेतृत्वाने मोठा धक्का दिला आहे

दरम्यान, एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदावरून हकालपट्टी केल्यानंतर त्यांच्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांना कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही, असा स्पष्टच संदेश दिल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे त्यांची भूमिका समजावून घेण्यासाठी तसेच मुख्यमंत्र्यांच्या निरोप घेऊन मिलिंद नार्वेकर सुरतच्या दिशेने रवाना झाले आहेत.

Share