धक्कादायक! परभणीत मनसे शहराध्यक्षाची किरकोळ वादातून हत्या

परभणी : जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मनसेचे शहराध्यक्ष सचिन पाटील यांची किरकोळ वादातून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. सचिन पाटील यांच्या मित्रानेच खून केला आहे, त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

प्राथामिक माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास सचिन पाटील आणि त्यांचे मित्र परभणी शहरातील शिवराम नगर येथे शिवराम चित्र मंदिरच्या शेजारी गप्पा मारत बसले होते. गप्पा दरम्यान एका मित्रा सोबत सचिन पाटील यांचा वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारी झालं.यावेळी समोरील मित्रांनी पाटील यांना सोबत असलेल्या चाकूने भोसकले. त्यात सचिन पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी उघडकीस आली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नवा मोंढा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आला. या घटनेमुळे परभणी शहरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मात्र सचिन पाटील यांच्या हत्येचं कारण अद्यापही अस्पष्टच आहे. पोलीस तपासामधून हत्येचं खरं कारण समोर येणार आहे.

Share