…तर बंद खोलीत दिलेलं वचन किती खरं असेल?

मुंबई : छत्रपती संभाजी राजे यांनी राज्यसभा निवडणुका लढवणार नसल्याचं आज स्पष्ट केलं आहे. शिवसनेने म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दिलेला शब्द पाळला नाही असं छत्रपती संभाजी राजे आजच्या पत्रकार परिषदेत बोलले आहेत. आपण कुणापुढे झुकून लढणार नाही असं म्हणत त्यांनी ही राज्यसभा निवडणुक लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यानंतर मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी ट्वीट मध्ये म्हणतात, “छत्रपतींच्या वंशजांना उघडपणे दिलेला शब्द जर हे लोक पाळत नसतील, तर बंद खोलीत दिलेलं वचन कितीसं खरं असेल?” असा प्रश्न शिवसेनेच्या भूमिकेवर उपस्थित केला आहे.

त्याचबरोबर मनसेचे नेते गजानन काळे ट्वीट करत म्हटलं, चोरसेना आता खोटीसेना म्हणून प्रसिद्ध होण्याच्या बेतात. भावाबद्दल कूटनिती करणाऱ्यांकडून राजेंना फसवले म्हणून काय आश्चर्य वाटून घ्यायचे? महाराष्ट्र आणि मराठा समाजाने ही जखम विसरता कामा नये. हिम्मत असेल तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळ येवून सांगा की आम्ही राजेना शब्द दिला नव्हता. अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.

संभाजीराजे काय म्हणाले?
“मला इतकं वाईट वाटतंय. मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा नव्हती की त्यांनी दिलेला शब्द मोडला. ‘स्वराज्य’ बांधण्यासाठी मी सज्ज झालो आहे. मावळ्यांना संघटित करण्यासाठी मी मोकळा झालो आहे. २००९ मध्ये लोकसभा निवडणूक हरल्यानंतर मी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. लोकांनी प्रेम दिलं. लोकांची इच्छा होती की सगळ्यांना संघटित करा. मला आज मिळालेली ही संधी आहे. माझी स्पर्धा माझ्याबरोबर आहे. म्हणून या विस्थापित मावळ्यांना संघटित करण्यासाठी, गोरगरीबांना न्याय देण्यासाठी मी ‘स्वराज्य’च्या माध्यमातून उभा राहणार आहे”, असं ते म्हणाले.

Share