धक्कादायक..! जिल्ह्यात सुुरु आहेत १३ अनधिकृत शाळा

औरंगाबाद : उन्हाळी सुट्ट्यांनंतर आता १३ जुनपासून शाळा सुरु होणार आहे. अनेक पालक आपल्या पाल्याच्या चांगल्या शिक्षणासाठी उत्कृष्ट शाळा शोधत असतात. मात्र आता शाळा शोधताना पालकांनी खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे.  कारण, औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात १३ अनधिकृत शाळा असल्याची माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली आहे. या शाळांवर कारवाई करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

मांढरे यांनी गुरुवारी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी त्यांनी ही माहिती दिली. अनधिकृत शाळांना एक लाख रुपये दंड आणि त्या बंद करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. बंद न केल्यास दररोज दहा हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य मंडळाशी संलग्न शाळांना राज्य शासन, सीबीएसई, आयसीएसई, आयबी, आयजीसीएसई, सीआयईच्या मान्यतेसह शासनाचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक आहे. मान्यता काढून घेतलेली शाळा सुरू असल्यास त्या शाळेस अनधिकृत शाळा म्हणून घोषित करावे. शाळांची यादी तत्काळ संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये ठळकपणे जाहीर करावी, अशा शाळांविरोधात दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचना शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी दिल्या आहेत.

अनधिकृत शाळा : गंगापूर तालुक्यातील अंबेलोहळ येथील सनराइज इंग्लिश स्कूल, गंगापुरातील देवगिरी ग्लोबल अकॅडमी, रांजणगाव व पडेगावातील द बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल, कन्नड तालुक्यातील वासडीतील न्यू श्री स्वामी समर्थ इंग्लिश स्कूल, बिडकीनची सेंट पोप इंग्लिश स्कूल, निल्लोड फाटा येथील संत ज्ञानेश्वर विद्यालय, सिल्लोडची समर्थ इंग्लिश स्कूल, किराडपुरा, नारेगाव येथील अल-हिदायत पब्लिक स्कूल, होली नेम अकॅडमी, पडेगाव, उस्मानपुरा येथील मेमर-ए-डेक्कन उर्दू प्रायमरी स्कूल, सुराणानगर येथील सेंट पॅट्रिक पी. एस. शाळा अनधिकृत आहेत.

Share