…तर राजकारण सोडून जाईल – खा. संजय राऊत

मुंबईः शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे ‘साडे तीन’ नेते तुरुंगात जाणार असल्याचा दावा केल्यानंतर ते नेते कोण, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना आणि महाविकास आघाडीवर आरोप करणाऱ्या नेत्यांचा यामध्ये समावेश असण्याची दाट शक्यता आहे. शिवसेना नेते संजय राऊत नेमका कोणता गौप्यस्फोट करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होत. संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत भाजपवर तोफ डागली आहे. संजय राऊत यांनी या पत्रकार परिषदेत भाजप नेत्यांवर आरोप लगावले आहेत. राऊत यांच्या या पत्रकार परिषदेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

  • ‘सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्रात ठिणगी पडेल’
    सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्रात ठिणगी पडेल, असं वक्तव्य नुकतच संजय राऊत यांनी केलं आहे.
  • हीच का तुमची लोकशाही’?, मोदी आणि शाहा यांना राऊतांचा सवाल
    ‘माझ्याशी वैर असेल तर मला टॉर्चर करा, कुटुंबियांना का त्रास देता?, हीच का तुमची लोकशाही’ असा सवाल पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा यांना राऊतांनी केला आहे.
  • हिंमत असेल तर ईडीने माझ्या घरी यावे
    ED वाले ऐका , या माझ्या घरी, मी लढणार, जितेंद्र नवलानी कोण आहे ? हे नाव ऐकल्यावर मुंबई आणि दिल्लीतील ED च्या लोकांचा घसा सुकेल.गेले ४ महिने ED च्या नावावर वसुली सुरू आहे, ७० बिल्डरकडून सुरू आहे, हे ED च्या काही अधिकाऱ्यांना माहीत आहे. मी याबाबत मोदी, अमित शाह यांना पत्र लिहिणार आहे. अशा ४ एजंटनी ३०० कोटी रुपये वसूल केले आहेत. – राऊत
  • किरीट सोमय्यांवर हजारो कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप
    पीएमसी बँक घोटाळ्याचा सोमय्यांकडून पुन्हा पुन्हा उल्लेख केला त्यातला मुख्य आरोपी राकेश वाधवानशी आमचे संबंध असल्याचे सांगितले. राकेश वाधवानच्या खात्यातून भाजपच्या खात्यात वीस कोटी गेले, पक्ष निधीच्या नावावर. मला सांगा निकॉन इन्फ्रा कंपनी कोणाची आहे? ती किरीट सोमय्यांची आहे. किरीट सोमय्या राकेश वाधवानचे भागिदार आहेत. किरीट समोय्यांनी हजारो कोटींचा प्रकल्प उभारला आहे पीएमसी बँक घोटाळ्यात सोमय्यांनी ब्लॅकमेल करून कॅश आणि दुसऱ्याच्या नावावर जमीन घेतली. वसईत लाडानीच्या नावावर ही चारशे कोटींची जमीन फक्त साडेचार कोटीला घेतली
  • किरीट सोमय्यांकडून मराठी भाषेचा द्वेष
    ‘किरीट सोमय्या हा माणूस मराठी द्वेष्टा आहे. त्यानेच मुंबईतील शाळांमध्ये मराठी सक्ती केल्यानंतर कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. आधी त्याचं थोबाड बंद करा. मराठीचा द्वेष करणाऱ्या या माणसाकडून अजून काय अपेक्षा करणार’, असं विधान संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे.
  •  ठाकरेंचे  बंगले दिसले तर मी राजकारण सोडणार- राऊत 
  • ठाकरे परिवाराच्या नावावर १९ बंगले आहेत, असा दावा त्या दलालने केला आहे, मुलुंडच्या दलालाने. माझं त्याला आव्हान आहे, आपण सगळे मिळून बस करून त्या १९ बंगल्यांवर पिकनिकला जाऊ. मी देतो चाव्या. ठाकरेंच्या मालकीचे बंगले आढळले तर मी राजकारण सोडेन .
  • ‘केंद्रीय यंत्रणांचं संकट महाराष्ट्रासह पश्चिम बंगालवर’
    संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच केंद्रीय यंत्रणांचं संकट महाराष्ट्रासह पश्चिम बंगालवर असल्याचं विधान केलं आहे.
  • माझ्या मुलीच्या लग्नात मेहंदी, नेल पॉलिश करणाऱ्यांची ईडीकडून चौकशी
    संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नात मेहंदी, नेल पॉलिश करणाऱ्यांची देखील ईडीकडून चौकशी करण्यात आली असून तिहार जेलमध्ये टाकण्याची धमकी देखील त्यांना देण्यात आली, असं संजय राऊत यांनी सांगितिलं आहे.
  • ..तेव्हा तेव्हा माझ्या नातेवाईकांच्या घरावर छापे पडले!
    ज्या ज्या वेळी मी म्हणालो की महाविकास आघाडी सरकार पडणार नाही, त्या त्या वेळी माझ्या नातेवाईकांवर, कुटुंबियांवर छाडी पडल्या. माझ्या मुलांना फोन करून धमक्या दिल्या की तुमच्या वडिलांना
  • कितीही नामर्दानगी करून पाठीवर वार केलेत तरी शिवसेना घाबरणार नाही 
    पत्रकार परिषदेची सुरुवात करताना संजय राऊत म्हणाले, “सर्व नेते आजची ही पत्रकार परिषद बघत आहेत. मला शरद पवारांचाही फोन आला. महाविकास आघाडीतला प्रत्येक प्रमुख नेता आमच्या सोबत आहे. ही पत्रकार परिषद हे सांगण्यासाठी आहे की कितीही नामर्दानगी करून तुम्ही पाठीवर वार केलेत तरी शिवसेना घाबरणार नाही.”
Share