‘बायको पाहिजे’ बॅनरची महिला आयोगाने घेतली दखल !

मुंबई : बायको पाहिजे असे बॅनर लावल्याने शहरात हा विषय चर्चेचा ठरला मात्र आता यावर महिला आयोगाने दखल घेतली आहे. सदर प्रकार हा महिलांचा अवमान करणारा असल्याचं महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी ट्विट करत म्हंटलं आहे.

चाकणकर यांनी ट्विटमध्ये म्हंटल आहे की,  निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे, असे जाहीरात फलक औरंगाबाद शहरात झळकले. याप्रकारची बातमी प्रसार माध्यमातून प्रसारित होत आहे. सदर फलक अतिशय गंभीर स्वरूपाचे व महिलांचा अवमान करणारी आहे. याप्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. तसेच औरंगाबाद शहराचे पोलिस आयुक्त यांना तपास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

Share