मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर पारस पोरवाल यांची आत्महत्या

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक पारस पोरवाल यांनी आत्महत्या केली आहे. पारस पोरवाल यांनी इमारतीच्या २३ व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भायखळा येथे गुरुवारी सकाळी आत्महत्येची घटना घडली आहे. पोरवाल यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. यात पोलिसांना पोरवाल यांनी लिहिलेली एक सुसाईड नोट सापडली आहे. त्यानुसार पोरवाल यांनी व्यवसायात झालेल्या आर्थिक तोट्यातून जीवन संपविण्याचे हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती मिळते आहे.

 

इमारतीचे टेरेस वरून उडी मारून आत्महत्या केली आहे. त्यांच्या जिमच्या खोलीत एक सुसाईड नोट सापडली असून त्यामध्ये आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, कोणाचीही चौकशी करू नये, असे लिहिलेले आहे. नातेवाईकांनी त्यांचे अक्षर ओळखले आहे. त्यांचाही कुणावर संशय नसल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले आहे.

Share